दिव्यांग व्यक्तीकडूनच साथिदाराची फसवणूक

हरेंद्रनं दिव्याग प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या नावाखाली वर्मा यांच्याकडून 10 हजार रुपये घेतले. त्यानंतर मुलीच्याच नावानं म्हाडात कमी पैशात घर मिळवून देण्याच्या नावाखाली 1 लाख 25 हजारही वर्मा यांच्याकडून घेतले.

दिव्यांग व्यक्तीकडूनच साथिदाराची फसवणूक
SHARES

अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं जोगेश्वरीतल्या कर्णबधीर व्यक्तीला महागात पडलं आहे. विशेष म्हणजे फसवणूक करणारा आरोपी हा देखील दिव्यांग आहे. आरोपीनं तक्रारदाराच्या मुलीला दिव्यांगाचं प्रमाणपत्र तसंच कमी पैशात म्हाडाची खोली मिळवून देण्याचं आश्वासन देत दीड लाख रुपये उकळले. याप्रकरणी दादरच्या रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी हरेंद्र कुमारला अटक केली. न्यायालयानं त्याला ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


नेमकं प्रकरण काय?

जोगेश्वरी परिसरात राहणारे तक्रारदार रमेश वर्मा हे कर्णबधीर आहेत. त्यांच्या पत्नीला ही पाठीचा त्रास असून 5 वर्षाची मुलगी थ्यालेसीमीया या आजारानं ग्रस्त आहे. काही दिवसांपूर्वी लोकलमध्ये वर्मा यांची ओळख आरोपी हरेंद्र कुमार यांच्याशी झाली होती. हरेंद्र हे सुद्धा दिव्यांग आहेत. काही दिवसांच्या ओळखीतून हरेंद्र आणि वर्मा यांच्यात चांगली मैत्री झाली. वर्मा यांनी आपल्या मुलीच्या आजारपणा विषयी हरेंद्र यांच्याकडे चर्चा केली. त्यावेळी हरेंद्र यांनी मुलीच्या नावावर दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढण्याचा सल्ला दिला. मात्र वर्मा यांची ऐवढी ओळख नसल्यानं त्यांनी हरेंद्र यांनाच त्याच्या ओळखीनं हे प्रमाणपत्र मिळवून देण्याची विनंती केली.


असे उकळले पैसे

हरेंद्रनं दिव्याग प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या नावाखाली वर्मा यांच्याकडून 10 हजार रुपये घेतले. त्यानंतर मुलीच्याच नावानं म्हाडात कमी पैशात घर मिळवून देण्याच्या नावाखाली 1 लाख 25 हजारही वर्मा यांच्याकडून घेतले. वर्मा यांचा खिसा सहज मोकळा करता येणं शक्य असल्याचं लक्षात आल्यानंतर हरेंद्रनं स्वतःच्या मुलीच्या शाळेसाठी 5 हजार खासगी कामासाठी 23 हजार असे पैसे उकळले. कालांतरानं वर्मा यांनी आपल्या आजारी मुलीच्या दिव्यांग प्रमाणपत्रासाठी हरेंद्र यांच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी हरेंद्र यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर वर्मा यांनी दादरच्या रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी हरेंद्र कुमार या दिव्यांगाला अटक केली.



हेही वाचा

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनची मंजुरी

जुगार खेळण्यासाठी धर्मादाय आयुक्तांच्या नावाने पैसे उकळले



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा