विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनची मंजुरी

मल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावीद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच मल्ल्याचा ताबा भारतीय सुरक्षा यंत्रणेला मिळणार आहे.

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनची मंजुरी
SHARES

कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून भारताबाहेर पळालेला तथाकथित मद्यसम्राट विजय मल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी भारत आता काही पावलं दूर आहे. मल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावीद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच मल्ल्याचा ताबा भारतीय सुरक्षा यंत्रणेला मिळणार आहे.

मात्र ब्रिटनच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मल्ल्यानं आपल्या ट्विटरवरून दिली आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयनं लंडन न्यायालयात मल्ल्याविरोधात एकत्रितपणे खटला दाखल केला होता. दोघांनी ही आपली बाजू भक्कमपणे लंडनच्या न्यायालयासमोर मांडल्यामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडन न्यायालयानं मंजुरी दिली आहे.

ब्रिटनडून हिरवा कंदील

मद्यसम्राट विजय मल्ल्यानं प्रत्यार्पण रोखण्यासाठी भारतातील कारागृह सुरक्षित नसल्याचं कारण ब्रिटनमधील वेस्टामिनिस्टर मेजिस्ट्रेट कोर्टात दिलं होतं. त्यानुसार ब्रिटन न्यायालयानं मल्ल्याला ज्या तुरुंगात ठेवण्यात येईल त्या जागेची व्हिडिओ शुटिंगद्वारे माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. केंद्र सरकारनं तज्ज्ञांच्या मदतीनं कारागृहाची पाहणी करून तसा अहवाल ब्रिटन न्यायालयात सादर केला. या अहवालानंतर ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावेद यांनी मल्याच्या प्रत्यार्पणासाठी हिरवा कंदील दाखवला


मल्ल्याची न्यायालयात धाव

वेस्ट मिनिस्टर मेजिस्ट्रेट न्यायालयानं १० डिसेंबर २०१८ रोजी प्रत्यार्पणासाठी मंजूरी दिली. मात्र न्यायालयाच्या या भूमिकेविरोधात अपील करणार असल्याचं ट्विट मल्ल्यानं केलं आहे. गृहमंत्र्यांच्या निर्णयापूर्वी अपिलची प्रक्रीया सुरू करता आली नाही. मात्र आता आपण आपील प्रक्रिया सुरू करणार असं मल्ल्यानं ट्विटमधून स्पष्ट केलं.


मल्ल्याला कुठं ठेवणार?

आर्थररोडच्या हाय सिक्युरिटी जेल (अंडा सेल)मध्ये मल्ल्याला ठेवण्यात येणार आहे. मल्ल्याला ठेवण्यात येणाऱ्या 'अंडा सेल'मध्ये या आधी २६/११ तील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. या 'अंडा सेल'ला लागूनच कैद्यांसाठी वैद्यकीय सेवा केंद्र आहे. शिवाय त्याला इतर आरोपींचे बराक जोडलेले नाहीत, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. अंडा सेलवर २४ तास सीसीटिव्ही कॅमेऱ्यांनी नजर ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर त्याच्यावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी बराकीबाहेर शस्त्रधारी शिपाई तैनात करण्यात येणार आहे.


फरार मल्ल्याची हेराफेरी

  • किंगफिशर एअरलाइन्सवर ३१ जानेवारी २०१४ पर्यंत ६ हजार ९६३ कोटी रुपयांचे कर्ज होतं. त्यात व्याजाची भर पडून मल्ल्या प्रवर्तक असलेल्या कंपनीच्या डोक्यावर ९००० कोटींहून अधिक रुपयांचं कर्ज
  • स्टेट बँक आॅफ इंडियासहित एकूण १७ बँकांकडून कर्ज
  • किंगफिशर एअरलाइन्स २०१२ मध्ये बंद, तर २०१४ मध्ये एअरलाइन्सचा परवाना रद्द
  • मार्च २०१६ मध्ये मल्ल्याचा लंडनमध्ये पळ
  • प्रिव्हेंशन ऑफ मनी लाॅड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत गुन्ह्याची नोंद
  • जून २०१६ मध्ये 'ईडी'च्या मागणीनुसार मुंबईतील विशेष न्यायालयाकडून फरार घोषित 
  • दीड वर्षांहून अधिक काळ लंडनमध्ये वास्तव्य
  • मुंबई, बंगळुरूतील १ हजार ४११ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त



हेही वाचा

निर्माता प्रेरणा अरोराविरोधात आरोपपत्र दाखल

१५ बँकांना कोट्यावधींचा गंडा घालणारे अटकेत

    Read this story in English
    संबंधित विषय
    ‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा