डॉ. पायलची आत्महत्याच? मानेवर गळफासाचे व्रण

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. बुधवारी डॉ. पायलचा शवविच्छेदन अहवाल आला असून या अहवालात तिच्या मानेवर गळफासाचे व्रण सापडले आहे.

डॉ. पायलची आत्महत्याच? मानेवर गळफासाचे व्रण
SHARES

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही महिला डॉक्टरांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी डॉ. पायलचा शवविच्छेदन अहवाल आला असून या अहवालात तिच्या मानेवर गळफासाचे व्रण सापडले आहे.


हत्या असल्याचा दावा

डॉ. पायल तडवीची आत्महत्या नसून, ती हत्या असल्याचा दावा पायलचे वकिल नितीन सातपुते यांनी न्यायालयात केला. पायलच्या शरिरावरील असलेल्या जखमा पाहता हे हत्येचं प्रकरण असल्याचं देखील वकिलांनी म्हटलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा हत्येच्या अनुषंगानं तपास केला पाहिजे. त्याशिवाय, यासाठी पोलिसांना १४ दिवसांची वेळ देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

या प्रकरणी नायर रुग्णालयाबाहेर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तसंच, पायलच्या कुटुंबाच्या सुरक्षेची मागणी केली आहे. त्याशिवाय, आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.



हेही वाचा -

शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत घेणार मंत्रीपदाची शपथ

जेटच्या कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी हस्तक्षेप करण्यासाठी आयटीएफचं पंतप्रधानांना पत्र



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा