घरापासून २ किलोमीटरपुढे जाऊ नका, अन्यथा तुमच्यावरही होऊ शकते कारवाई

मुंबईत घरापासून २ किलोमीटर अंतरावर ते ही अत्यावश्यक सेवेसाठी जाण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यापुढे गेल्यास पोलिस तुम्हच्यावर कारवाई करू शकतात. रविवारी दिवसभरात पोलिसांनी ५ हजार बेशिस्त चालकांची वाहने हस्तगत केली आहेत.

घरापासून २ किलोमीटरपुढे जाऊ नका, अन्यथा तुमच्यावरही होऊ शकते कारवाई
SHARES

राज्यात कोरोनाचा कहर दिसेंदिवस वाढत असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी लाॅकडाऊनचे नियम शिथील केले असल्याने अनेक जण मुंबईच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.  यामुळे मुंबईत घरापासून २ किलोमीटर अंतरावर ते ही अत्यावश्यक सेवेसाठी जाण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यापुढे गेल्यास पोलिस तुम्हच्यावर कारवाई करू शकतात. रविवारी दिवसभरात पोलिसांनी ५ हजार  बेशिस्त चालकांची वाहने हस्तगत केली आहेत.

हेही वाचाः-कोरोनाचा कहर ! राज्यात ५४९३ नवे रुग्ण, १५६ जणांचा मृत्यू

 लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देताच, नागरिक मोठ्या संख्येने वाहने घेऊन रस्त्यावर गर्दी करू लागले. बहुदा राज्यशासनाच्या अटीचा त्यांना विसरच पडला असावा. दरम्यान अशा बेजबाबदार नागरिकांविरोधात पोलिसांनी आता कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मुंबई रविवारी ठिक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी लावून तब्बल ५ हजार वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश जरी मिळाले असले. तरी धोका अजून टळलेला नाही. ही बाब नागरिकांनी ही विसरून चालणार नाही. राज्य सरकारने नागरिकांना अत्यावश्य गोष्टींसाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या दिल्या आहेत. तसेच त्यासाठी काही नियम ही घालून दिलेले आहे. या नियमाचे पालन करणे नागरिकांनी गरजेचे आहे. कोविड १९ या महामारीचा धोका कायम आहे. अशा स्थितीत आपण सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, शक्यतो घराबाहेर न पडणे, वारंवार हात धुणे या गोष्टी पाळणं आवश्यक आहे असं पोलीस उपायुक्त प्रणय अशोक (ऑपरेशन्स) यांनी हे आवाहन केलं

हेही वाचाः-Lockdown in Maharashtra: ३० जूननंतर लाॅकडाऊन सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं

मुंबईत लॉकडाऊनच्या काळात कलम १८८ अंतर्गत आतापर्तंयत१०  हजार ३७१  गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्याप्रकरणी १९ हजार ६३५ नागरीकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारपर्यत त्यातील ११ हजार ७५१ नागरीकांना अटक करण्यात आली आहे. त्यात मास्क न वापरणे, लॉकडाऊन नियम तोडणा-यांचा समावेश आहे. नागरीकांनी नियम पाळून स्वतःसह इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नागरीकांनी विनाकारण घरातून बाहेर पडणेही टाळले पाहिजे, असे प्रणय अशोक यांनी आवाहन केले.



ही आहे पोलिसांनी जाहिर केलेली नियमावली


-आत्यावश्यक कामांसाठीच नागरीकांनी घरातून बाहेर पडावे.

-घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर सक्तीचा

-बाजार,सलून, केशकर्तनालये,मध्ये केवळ दोन किलोमीटरपरिसरात राहणारे नागरीकच जाऊ शकतील

-व्यायामासाठीही दोन किलोमीटरच्या परिसरातच जाण्याची मुभा आहे

-अत्यावश्यक कामासाठीही दोन किलोमिटर परिसरातच जाण्याचे आवाहन

-वैद्यकीय आपतकालीन स्थिती, कार्यालयात दोन किलोमीटरपुढे जाण्याची मुभा देण्यात आली आहे

-सोशल डिस्टन्सिन्गचा वापर करणे आवश्यक आहे

-नियमांचा भंग करणा-यांविरोधात कारवाई करण्यात येईल.

-नियमभंग करणारे दुकानदार, विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात येईल.

-आत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सामान्य नागरीकांना रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी, नियम मोडल्यास कारवाई

-वैध कारणाशिवा स्थानिक भागांपासून दूर परिसरातील वाहने जप्त केली जातील.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा