डोंगरी पोलिसांनी जप्त केला पावणे चार लाखांचा ऐवज जप्त

 Dongri
डोंगरी पोलिसांनी जप्त केला पावणे चार लाखांचा ऐवज जप्त
डोंगरी पोलिसांनी जप्त केला पावणे चार लाखांचा ऐवज जप्त
See all

डोंगरी - डोंगरी पोलिसांनी विभागात गस्त घालताना दोन संशयितांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. कमरुद्दीन शेख आणि इर्शाद मोहम्मद खान अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही मानखुर्द येथे राहणारे असून त्यांच्याकडून 18 हजार 500 रुपयांचे 3 मोबाइल, 3 मनगटी घड्याळं, 1 कॅमेरा आणि सुमारे पावणे चार लाखांचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत.

पोलीस निरीक्षक अंकुश काटकर आणि त्यांच्या टीमनं केलेल्या कारवाईत या दोघांचा पर्दाफाश झाला असून या दोन्ही आरोपींवर देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्याच चोरीच्या गुह्यातला हा ऐवज असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या दोघांवर डोंगरी पोलीस ठाण्यात मकोकान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही दिली आहे.

Loading Comments