आग्रीपाड्यात दारुड्यांचा तरुणावर हल्ला

 Agripada
आग्रीपाड्यात दारुड्यांचा तरुणावर हल्ला
आग्रीपाड्यात दारुड्यांचा तरुणावर हल्ला
See all

अाग्रीपाडा - आग्रीपाडा परिसरातील झूला मैदानाजवळ हनीफ रजा या तरुणावर शनिवारी रात्री दोन दारुड्यांनी हल्ला केला. तरुण झूला मैदानाजवळून जात असताना दोन दारुड्यांनी त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी या तरुणानं प्रयत्न केला असता त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. गंभीर अवस्थेतल्या हनीफला नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. मात्र डॉक्टरांनी पोलीस केस असल्याचं सांगत उपचार करण्यासाठी नकार दिला. त्यानंतर त्याला जे.जे  रुग्णालयात दाखल केलं गेलं आणि उपचार करण्यात आले. याप्रकरणी कोणावरही गु्न्हा दाखल झालेला नाही.

Loading Comments