पालघर येथील ड्रग्सचा कारखाना उद्धवस्त, 483 किलो एफिड्रीन ड्रग्जचा साठा जप्त

ड्रग्सचा कारखाना उद्धवस्त करून 483 एफिड्रीन जप्त

पालघर येथील ड्रग्सचा कारखाना उद्धवस्त, 483 किलो एफिड्रीन ड्रग्जचा साठा जप्त
SHARES
देशात आधीच कोरोना या संसर्ग रोगाशी सर्वच लढा देत असताना, संधी साधून ड्रग्ज तस्करांनी डोक वर काढलं आहे. महसुल गुप्तवार्ता संचलनालयाने(डीआरआय) पालघर येथन ड्रग्सचा कारखाना उद्धवस्त करून 483 एफिड्रीन जप्त केले आहे.बाजारात या ड्रग्जची किॆमत 5 कोटी इतकी आहे. या प्रकरणी डिआरआयने कंपनी मालकांसह दोघांना अटक केली आहे.

 

पालघर येथील तारापूूर एमआयडीसी परिसरातील जगदंबा केमिकल कारखान्यावर डीआरआयने छापा टाकण्यात आला. तेथे चार दिवसांपासून एफिड्रीन निर्मीती होत असल्याचे निष्पन्न झाले असून डीआरआयने याप्रकरणी 483 किलो एफिड्रीन रसायन जप्त केले आहे. याप्रकरणी रवी सिंग, राकेश खानिवडेकर व प्रदीप थोकडे यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. यातील सिंग हा बोईसर येथील औषध विक्रेता आहे. या डॅग्स निर्मीतीतील एक भागीदार असून एफिड्रीन निर्मीतीची प्रक्रिया तो पाहत होता. तर प्रदीप हा कारखान्याचा मालक आहे. त्याने ड्रग्स निर्मीतीसाठी कारखाना सिंगला चालवायला दिला होता. त्यासाठी प्रत्येक लॉट मागे त्याला सहा लाख रुपये मिळत होते. राकेश हा देखील याप्रकरणातील मुख्य आरोपी असून तो सिंगसोबत भागीदारीत डिसेंबर 2018 पासून ड्रग्स निर्मीती करत होता. यापूर्वी आरोपींनी बेळगाव व बोईसरमध्येही अशा पद्धतीने ड्रग्स निर्मीती केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. 

आरोपीं नेहमी अशा पद्धतीने कारखाने काम करण्यासाठी भाडे तत्त्वावर घ्यायचे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. सुरक्षा यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आरोपी पालघर येथून ड्रग्स निर्मीतीचा कारखाना कोल्हापूर येथील चांदगड येथे हलवणार होते. पण त्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कोल्हापूर येथेही एका ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे. तेथेही रसायन निर्मीतीचे एक युनीट आरोपींनी उभे केले असून तेथूनही काही प्रमाणात एफिड्रीन बनावण्यासाठी लागणारे रसायन जप्त करण्यात आले आहे. तिनही आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा