मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर ड्रोनची नजर, गुन्हेगारीला बसणार चाप

ड्रोनचे परिचालन क्षेत्र २ किमी आहे आणि २५ मिनिटांपर्यंत ते हवेत उड्डाण करू शकते.

मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर ड्रोनची नजर, गुन्हेगारीला बसणार चाप
SHARES

रेल्वेनं प्रवास करताना प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये विशेष म्हणजे गुन्हेगारीच्या घटना अधिक घडत असतात. त्यामुळं या घटनांवर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवलं जात आहे. अशातच आता ड्रोनच्या माध्यमातून या घटनांवर पाळत ठेवण्यात येणार आहे. यामुळं मनुष्यबळाचा वापरही मर्यादित होणार आहे.

रेल्वे परिक्षेत्र, रेल्वे ट्रॅक, यार्ड, कार्यशाळा इत्यादी रेल्वे क्षेत्रात चांगली सुरक्षा व पाळत ठेवण्यासाठी मुंबई विभागानं अलीकडंच २ निन्जा यूएव्ही खरेदी केल्या आहेत. आरपीएफच्या मॉडर्नरायझेशन सेलमधील चार कर्मचाऱ्यांच्या पथकाला प्रशिक्षण देण्यात आले असून, या ड्रोन्स उड्डाणासाठी परवानाही मिळविला आहे. ड्रोनचे परिचालन क्षेत्र २ किमी आहे आणि २५ मिनिटांपर्यंत ते हवेत उड्डाण करू शकते.

या ड्रोनचं टेक ऑफ वजन २ किलोपर्यंत आहे आणि दिवसा १२८०बाय ७२० पिक्सेलवर एचडी प्रतिमा कॅप्चर करू शकते. यात रिअल टाइम ट्रॅकिंग, व्हिडीओ प्रवाह आणि स्वयंचलित अपयश-सुरक्षा मोड देखील आहे. ड्रोन बीट्सचे विभाजन संपूर्ण रेल्वे मालमत्ता, क्षेत्राची संवेदनशीलता, गुन्हेगारांचे क्रियाकलाप इत्यादींवर आधारित केले गेले आहे. ड्रोन ‘आय इन द स्काय’ म्हणून काम करते आणि संपूर्ण क्षेत्रावर नजर ठेवते. कोणतंही संशयास्पद क्रियाकलाप लक्षात आल्यास गुन्हेगाराला लाइव्ह पकडण्यासाठी, विभागातील जवळच्या आरपीएफ पोस्टवर माहिती दिली जाते.

ड्रोन्सची वैशिष्ट्यं :

  • रेल्वे मालमत्तेची तपासणी आणि यार्ड्स, वर्कशॉप्स, कार शेड्सची सुरक्षा करता येईल.
  • रेल्वे परिसरातील गुन्हेगारी आणि असामाजिक बाबींवर पाळत ठेवता येणार आहे. 
  • जुगार खेळणे, कचरा टाकणे, अवैध फेरीवाले याला आळा बसेल.
  • गाड्यांच्या सुरक्षित संचालनासाठी असुरक्षित/धोकादायक विभागांचे विश्लेषण करता येईल.
  • आपत्ती साइटवर आणि इतर एजन्सींसह समन्वय साधता येईल.
  • रेल्वे मालमत्तेवरील अतिक्रमणांचे मूल्यांकन करण्यासाठी रेल्वे मालमत्तेचं मॅपिंग करता येईल.
  • गंभीर परिस्थितींमध्ये, सणासुदीच्या काळात गदीर्चे निरीक्षण/व्यवस्थापन करता येईल.



हेही वाचा -

मुंबईत थेट विसर्जनाला बंदी, पालिकेनं दिले 'हे' पर्याय

वांद्रेत रिकामी इमारत घरावर कोसळली



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा