उड्डाणपुलाखाली थाटले संसार

 Amar Mahal
 उड्डाणपुलाखाली थाटले संसार

अमर महल - चेंबूरच्या अमर महल येथील लिंक रोड उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात संसार थाटण्यात आले आहे. तसेच येथे गर्दुल्ल्यांचा वावर असल्याने याठिकाणी एखादी विपरीत घटना होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत उड़्डाणपुलाखाली होणारी पार्किंग हटवून त्याठिकाणी गार्डन तयार करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. मात्र चेंबूरमधील एकाही उड्ढाणपुलाखाली अशा प्रकारे गार्डन बनवण्यात आलेले नाहीत. चेंबूरच्या अमर महल येथील लिंक रोड उड्डाणपुलाखाली तर सध्या मोठ्या प्रमाणात गर्दुल्ले आणि इतर लोकांचा वावर पहायला मिळत आहे. या उड्डाणुलाखालीच त्यांनी संसार थाटले आहेत. कधी-कधी तर काही गर्द्दुल्ले नशा देखील करत असतात. त्यामुळे "पालिका,एमएमआरडीए यांनी तत्काळ कारवाई करून त्यांना येथून हटवावे आणि उड्डाणपुलाखाली गार्डन तयार करावे", अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

Loading Comments