चोरीत अडथळा ठरणाऱ्या कुत्र्याचा काढला काटा


चोरीत अडथळा ठरणाऱ्या कुत्र्याचा काढला काटा
SHARES

कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच सतर्कता म्हणून अनेकजण जण कुत्रा  पाळतात. मात्र हेच कुत्रे अनेक गर्दुले आणि भुरट्या चोरट्यांसाठी अनेकदा अडथळे ठरतात. प्रतिक्षानगरमध्ये चोऱ्या करताना गर्दुल्यांसाठी कायम अडथळा ठरणाऱ्या कुत्र्याची निर्दयी हत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. या प्रकरणी कुत्र्याला संभाळणारे श्याम धुमाळ यांनी वडाळा टीटी पोलिस ठाण्यात धाव घेतली.


चोरीचे प्रयत्न फसले

सायनच्या प्रतिक्षानगर परिसरात श्याम धुमाळ हे राहत असून त्यांनी युवा नावाचा कुत्रा पाळला होता. युवाच्या  सतर्कतेमुळे चोर आणि गर्दुल्यांचा परिसरातील वावर कमी झाला होता. याच परिसरात राहणारे सुरेश आणि तंबी हे नशेच्या आहारी गेले होते. त्यामुळे नशा करण्यासाठी  खिशात पैसे नसल्यास ते नागरिकांचे साहित्य चोरून विकायचे. मात्र युवामुळे अनेकदा त्यांच्या चोरीचा प्रयत्न फसला होता. त्यामुळे दोघेही  युवावर डोळा ठेवून होते.  


राॅडने मारहाण

गुरूवारी दुपारी युवा प्रतिक्षा नगर येथील पंचशील नगर येथे झोपलेला असताना नशेत असलेल्या सुरेश आणि तंबीने त्याला राॅडने मारहाण करून त्याची निर्घुण हत्या केली. त्यावेळी अनेक स्थानिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावरही हे दोघे धावून गेले.



हेही वाचा -

समलैंगिक संबंध उघडकीस आणण्याची धमकी; साथीदाराचाच काढला काटा 

फटका टोळीने घेतला प्रवाशाचा बळी; कळवा स्थानकातील घटना




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा