COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

ड्रग्ज तस्करांविरोधात मुंबई पोलिसांना फास आवळला

राज्य गुन्हे नोंद विभागाच्या(एनसीआरबी) २०१९ च्या आकडेवारीनुसार मुंबईत ड्रग्स संबंधीत १२ हजार ४१८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

ड्रग्ज तस्करांविरोधात मुंबई पोलिसांना फास आवळला
SHARES

सुशांत सिंग मृत्यूप्रकरणात ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांनी शहरात ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांविरोधात फास आवळण्यास सुरूवात केली आहे. अशाच एका कारवाईत धारावी पोलिसांनी एका ४२ वर्षीय तस्कराला अटक केली आहे. मोहम्मद युसुफ खान उर्फ बाटला असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून १२९ ग्रॅम एमडी हस्तगत केले आहे. राज्य गुन्हे नोंद विभागाच्या(एनसीआरबी) २०१९ च्या आकडेवारीनुसार मुंबईत ड्रग्स संबंधीत १२ हजार ४१८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

हेही वाचाः-मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

राज्यात ड्रग्ज विरोधात १४ हजार १५८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्यात १३ हजार १९९ गुन्हे सेवनासाठी ड्रग्स बाळगल्याप्रकरणी होते, तर ९५९ गुन्हे तस्करीसाठी ड्रग्स बाळगल्याप्रकरणी दाखल करण्यात आले होते. भादंवि कलमांसह एसएलएल गुनह्यांचाही त्यात समावेश आहे. महाराष्ट्रापाठोपाठ पंजाब(११,५३६) व उत्तर प्रदेशात(१०,१९८) ड्रग्सप्रकरणी  गुन्ह्यांची नोंद झाली आहे. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत देशात ७२ ७७९ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात ४५ हजार ५०३ एसएलएलचा समावेश आहे. तर देशात तस्करीप्रकरणी २७ हजार २७६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. ड्रग्ज कारवाईत मुंबई आणि महाराष्ट्र अग्रेसर आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आल्यानंतर तर पोलिसांनी तस्करांभोवती आणखी फास आवळण्यास सुरूवात केली.

हेही वाचाः-प्रवाशांसाठी गुड न्यूज! ९ आॅक्टोबरपासून धावणार ‘या’ ५ विशेष एक्स्प्रेस

धारावीत देखील एक तस्कर एमडी ड्रग्जची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार धारावी पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांना आरोपी मोहम्मद युसुफ खान उर्फ बाटलाच्या हालचालीवर संशय आल्याने पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ पोलिसांना १२९ ग्रॅम एमडी आढळून आले. या ड्रग्जची किंमत बाजारात २ लाख ३२ हजार इतकी आहे. पोलिसांनी त्याच्यावर कलम ८ (क), २२(ब),एनडीपीएस अँक्ट १९८५ नुसार गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा