दारू पिवून गाडी चालवणं तरुणीला पडलं महागात


दारू पिवून गाडी चालवणं तरुणीला पडलं महागात
SHARES

मुंबई झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची चाळण झालेली असताना ताडदेव येथे खड्ड्तून दारूच्या नशेत स्कूटीने वाट काढताना झालेल्या अपघातात एक तरुणी जखमी झाली आहे. यामध्ये आदीती काडगेच्या डोक्याला मार लागला असून तिच्यावर भाटीया रुग्णालयात उपचार सुरू आहे.


आणि अपघात झाला

ताडदेव येथील फोरजेट हिल परिसरातील जयहरी सोसायटीमध्ये आदिती पतीसोबत राहते. किरकोळ कारणावरून आदीती दारूच्या नशेत असताना मंगळवारी रात्री तिच्या पतीसोबत भांडण झालं. कालांतरानो हा वाद विकोपाला गेल्याने दारूच्या नशेत पतीची पोलिसात तक्रार करण्यासाठी आदीती स्कूटी घेऊन घराबाहेर पडली. तिच्या पाठोपाठ तिचा पतीही निघाला. रात्रीच्या अंधारात नशेत असलेल्या आदीतीला पोलिस ठाण्याच्या मार्गावर असलेला खड्डा दिसला नाही. त्यावेळी स्कूटी खड्ड्यात गेल्याने आदीतीचं स्कूटीवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला.


दारूच्या नशेत चालवली गाडी

या अपघातात आदीतीच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. सुदैवाने मागोमाग पती येत असल्याने ती वाचली. सध्या तिला उपचारासाठी भाटीया रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आदीतीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वैद्यकीय अहवालात आदीती नशा करून गाडी चालवत असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा