महिला पोलिसाला पोलीस ठाण्यात मारहाण

  Mumbai
  महिला पोलिसाला पोलीस ठाण्यात मारहाण
  मुंबई  -  

  कुरार- दारूच्या नशेतील व्यक्तीकडून महिला पोलिसाला मारहाणीची धक्कादायक घटना मालाडमधल्या कुरार पोलीस ठाण्यातच सोमवारी घडली. याप्रकरणी मंगल यादव या 36 वर्षांच्या व्यक्तीला अटक झाली आहे. मंगलला कुरारमधल्या बारमध्ये धिंगाणा घातल्याबद्दल अटक झाली. मात्र पोलीस ठाण्यातही त्याने तमाशा केला. त्याला शांत करू पाहणाऱ्या के. सकपाळ यांच्याशीही त्याने धक्काबुक्की केली. थांबवू पाहणाऱ्या महिला पोलीस शिल्पा गोवेकर यांच्याही त्याने कानशिलात लगावली.

  सरकारी कामात अडथळा आणणं आणि सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केलं असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.