बोरिवलीत पोलीस स्टेशनसमोरच दारूड्याचा अर्धनग्न धिंगाणा

  मुंबई  -  

  बोरीवली पोलीस स्टेशनच्या बाहेर एक दारूडा अर्धनग्न अवस्थेत उपोषणाला बसल्याचे चित्र गुरुवारी पहायला मिळालं. विशेष म्हणजे एवढं असूनही पोलिसांनी त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. 

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दारूड्याने धिंगाणा घातला तेव्हा पोलीस उपायुक्त विक्रम सिंह देशमाने यांच्यासह पोलीस निरीक्षक देखील उपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे हा दारूडा गुरुवारी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत पोलीस ठाण्याबाहेर अर्धनग्न अवस्थेत हंगामा करत शिव्या देत होता. तरी देखील त्याला अडवण्याचा प्रयत्न पोलिस करत नसल्याचं दृश्यांमध्ये दिसून येत आहे. उलट पोलीस त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखेच करत होते. दरम्यान, काहींनी त्याच्यावर पाणी ओतून त्याची नशा उतरवण्याचा प्रयत्न केला. जर पोलीस स्टेशनसमोरच दारूड्यांवर वचक ठेवू शकत नसतील तर बाकीच्या दारुड्यांवर काय वचक ठेवणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.