दारूड्या नातवाकडून आजीचा विनयभंग

 Mankhurd
दारूड्या नातवाकडून आजीचा विनयभंग

मित्रांसोबत पार्टी करुन रात्री उशिरा घरी परतलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन नातावाने त्याच्या ५५ वर्षीय वृद्ध आजीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथे घडली आहे. याबाबत आजीच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

पिडीत महिला मानखुर्दच्या महाराष्ट्र परिसरात राहते. या महिलेचा १७ वर्षीय नातू शुक्रवारी मध्यरात्री पार्टी करुन घरी परतला. घरातील सर्वजण झोपलेले असल्याने आजीनेच घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर त्याला उशिरा येण्याचे कारण विचारल्यानंतर नातवाने आपला विनयभंग केल्याचे या महिलेने तक्रारीत नमुद केले आहे.

Loading Comments