• अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
SHARE

बोरिवली - सौराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये चढताना शर्मिलाबेन पटेल यांचा पाय घसरून पडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास बोरिवली स्टेशनच्या फलाट क्रमांक सहावर उभ्या असलेल्या सौराष्ट्र जनता एक्स्प्रेसमध्ये चढताना तोल जाऊन शर्मिलाबेन रेल्वेचा डबा आणि प्लॅटफॉर्म यांच्यामधल्या जागेत अडकल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यावेळी कांदिवली येथील डॉ. आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या