मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी प्रताप सरनाईकांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळेंना अटक

अमित चांदोळे याच्या अटकेनंतर आता प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी प्रताप सरनाईकांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळेंना अटक
SHARES

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अमित चांदोळे याच्या अटकेनंतर आता प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टॉप्स सिक्युरिटी या खासगी कंपनीशी संबंधित अमित चांदोळे यांना अटक केल्याची माहिती मिळते.

आर्थिक अनियमितता असल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. १२ तासांच्या चौकशीनंतर अमित यांना अटक करण्यात आली आहे. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय समजले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीनं मंगळवारी २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचं सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीनं ५ तास चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीनं चौकशीसाठी बोलावले होतं. मात्र, आपण परदेशातून आल्यानं ८ दिवस आपल्याला सक्तीनं क्वॉरंटाईन राहावं लागत आहे.

'विहंगची पत्नीही आजारी असल्यानं मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही', असं सरनाईक यांनी ईडीला कळवल्याचं समजतं. त्यामुळं सरनाईक ईडीसमोर चौकशीला हजर राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सरनाईक यांनी ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली असली तरी अजून त्यावर ईडीनं काही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळं ईडी काय निर्णय घेतं याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा