ईडी बजावणार इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियाविरोधात रेड कॉर्नर नोटीस ?

मिर्चीने बेकायदेशीर मिळवलेल्या मालमत्तेतून भारतात मालमत्ता खरेदी केल्या प्रकरणी ईडीने इक्बालची मुले आणि पत्नी विरोधात डिसेंबर. 2019 मध्ये गुन्हा नोंदवला होता.

ईडी बजावणार इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियाविरोधात रेड कॉर्नर नोटीस ?
SHARES
बेकायदेशीर मिळवलेल्या मालमत्तेच्या चौकशीसाठी ईडीकडून नोटीस पाठवून देखील चौकशीसाठी हजर न राहणाऱ्या मृत इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियांविरोधात ईडी रेड काँर्नर नोटीस बजावणार असल्याची माहिती सूञांनी दिली आहे. इक्बाल हा एकेकाळी दाऊदचा विश्वासू हस्तक होता. माञ 2013 मध्ये त्याचा ह्रद्यविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. मिर्चीने बेकायदेशीर मिळवलेल्या मालमत्तेतून भारतात मालमत्ता खरेदी केल्या प्रकरणी ईडीने इक्बालची मुले आणि पत्नी विरोधात डिसेंबर. 2019  मध्ये गुन्हा नोंदवला होता.


 मिर्चीची पत्नी हाजरा मेमन, दोन मुलं आसीफ व जुनैद यांच्यासह 13 जणांवर ईडीने डिसेंबर,2019 मध्ये गुन्हा दाखल केला होता. मिर्चीने बेकायदेशीररित्या मिळवलेल्या मालमत्तेतून भारतात मालमत्ता खरेदी केली. त्यानंतर ही मालमत्ता पुनर्विकासासाठी विकण्यात आल्याचा आरोप आहे. त्यात मिर्चीने बेकायदा खरेदी केलेल्या मालमत्तेचा लाभ त्याच्या कुटुंबियांनी घेतल्याचा आरोप आहे. ते या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी याप्रकरणी अनेकवेळा मिर्चीच्या कुटुंबियांना समन्स पाठवले होते. पण त्यानंतर ते हजर न झाल्यामुळे अखेर ईडीने मार्च महिन्यात मिर्ची कुटुंबियांविरोधात अजामिनपात्र वॉरट जारी करण्यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. नुकतीच ईडीची ती मागणी न्यायालयाने मान्य केली होती.  

भारतातील गुन्हेगारीतून कमवलेल्या पैशांतून इक्‍बाल मिर्ची व त्याच्या कुटुंबियांच्या नावावर लंडनमध्ये 25 मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील 16 मालमत्ता हाजरा मेमन हिच्या नावावर आहेत.याशिवाय युकेमध्ये चार कंपन्यांच्या नावावर सहा मालमत्ता आहेत. याशिवाय यूएईतील मिहाय इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लि. या कंपनीच्या नावावरही लंडनमेध्य तीन मालमत्ता आहेत. याशिवाय एकट्या मुंबईत मिर्चीची बेनामी 500 कोटींची मालमत्ता आहे.

कोण होता इक्बाल मिर्ची?

दाऊदचा विश्‍वासू असलेल्या मिर्चीला 1994 मध्ये तडीपार केलेहोते. दाऊद टोळीचा अंमली पदार्थांचा व्यवसाय तोसांभाळत असे. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलने देखील नोटीस जारी केली होती. 1995 साली तो भारतातूनविदेशात पळून गेला. 1988 पासून अंमली पदार्थांच्यातस्करीप्रकरणी तो मुंबई पोलिसांना हवा आहे. भायखळायेथे मिरचीच्या कुटुंबियांचा मिरची विकण्याचा व्यवसायहोता. त्यामुळेच त्याला गुन्हेगारी जगतात मिर्ची हे टोपणनाव मिळाले. अंमली पदार्थांच्या प्रामुख्यानेमॅण्ड्रेक्‍स गोळ्यांच्या तस्करीत तो कुप्रसिद्ध आहे.भारतातून परागंदा झाल्यानंतर मिरचीने दुबईत आपलेसाम्राज्य निर्माण केले.14 ऑगस्ट, 2013 मध्ये मिर्चीचा लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्‍यामुळे मृत्यू झाला होता.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा