अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणाऱ्याला अटक

 Goregaon
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणाऱ्याला अटक

गोरेगाव - राहत्या घरातून पळून गेलेली अल्पवयीन मुलगी आणि आरोपीला पोलिसांनी अटक केली. आरे कॉलनी येथून 9 नोव्हेबरला 14 वर्षांची मुलगी आणि 22 वर्षांचा आरोपी भाऊसाहेब देवरे पळून गेले होते. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना नाशिक येथून 21 डिसेंबरला अटक केली. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला 27 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी प्रेमप्रकरणातून पळ काढला.

Loading Comments