अजय देवगणच्या नावाचा गैरवापर, २०० कोटींची फसवणूक


अजय देवगणच्या नावाचा गैरवापर, २०० कोटींची फसवणूक
SHARES

प्रसिद्ध सिने तारका आणि नेत्यांच्या नावांचा गैरवापर करून फसणूक होत असल्याचे अनेक प्रकार आजवर समोर आले आहेत. आता असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या नावाचा गैरवापर करत एका टोळीने २०० कोटींची फसवणूक केली आहे.  

यूपी एसटीएफ (स्पेशल टास्क फोर्स) ने अभिनेता अजय देवगणच्या नावाचा गैरवापर करत हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीत मॉडेल आणि अभिनेत्री अनारा गुप्ता हीच्या नावाचा देखील समावेश आहे.


अनारा गुप्ता फरार

इलाहाबादच्या सिव्हिल लाइंस परिसरातून या टोळीतील बनावट दिग्दर्शक ओमप्रकाश यादव याला एसटीएफने अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. या टोळीनं जवळपास ४५ हजार लोकांची फसवणूक केली आहे.

ओमप्रकाशकडून मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. याचसोबत अनारा गुप्तासोबत झालेले व्हॉट्सअॅप संभाषणही पोलिसांच्या हाती लागलं आहे. ही माहिती उघड झाल्यानंतर अनारा गुप्ता फरार झाली, अशी माहितीही पोलिसांनी दिली.  


अशी करत होते फसवणूक

या टोळीतील मिश्रा आणि इतर साथिदारांनी ‘इम्पेरर मीडिया एंड एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड’ नावाचे एक प्रोडक्शन हाऊस उघडले होते. त्यानंतर अजय देवगणसोबत एक चित्रपट बनवणार असल्याची बतावणी ते करायचे. याचसोबत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक आठवड्याला ६ ते १० टक्के शेअर देईल. ज्यामुळे लोकांनी विश्वास दाखवत गुंतवणूक केली.  Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा