ऑनलाइन मैत्रीची ऑफलाइन तक्रार

 Andheri
ऑनलाइन मैत्रीची ऑफलाइन तक्रार

वर्सोवा - एका मॉडेलनं मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवलाय. दिल्लीला राहाणारा मॉडेलचा मित्र दीपक सिंग यानं सोशल मीडियावर अश्लील मेसेजेस पाठवून विनयभंग केल्याचा आरोप या मॉडेलनं केलाय. आठवड्यापूर्वीच फेसबुकवर या दोघांची मैत्री झाली होती आणि मोबाइल नंबरही शेअर केले. दोघांचं मोबाइलवर बोलणंही झालं. त्यातल्या काही गोष्टी खटकल्यानं या मॉडेलनं थेट वर्सोवा पोलीस स्टेशन गाठलं. वर्सोवा पोलीस या प्रकाराची चौकशी करत, असून चौकशीनंतर योग्य ती कारवाई करू, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.

Loading Comments