बनावट नोटांची तस्करी, गुन्हे शाखेने केला पर्दाफाश


बनावट नोटांची तस्करी, गुन्हे शाखेने केला पर्दाफाश
SHARES

नोटबंदीनंतर चलनात आलेल्या दोनशे आणि पाचशेच्या बनावट नोटा वितरीत करणाऱ्या रॅकेटचा, मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अब्दुल कल्लू खान (२४), महेंद्र तुकाराम खंडस्कर (५०), फारूख पाशा चौधरी (३३), आमीन उस्मान शेख (४१) अशी या आरोपींची नावे आहेत. या टोळीकडून  पोलिसांनी तब्बल ३५ लाख ५४ हजाराच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत.

नोटबंदीनंतर चलनात आलेल्या विविध मूल्याच्या नोटा या अत्यंत सुरक्षित असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला होता. काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणे, हादेखील नोटबंदीचा एक उद्देश असल्याचे तेव्हा सांगितले गेले. पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी बनावट नोटांच्या साहाय्याने भारतीय अर्थव्यवस्थेला कसा सुरुंग लावला, या कहाण्याही तेव्हा सांगितल्या जायच्या. त्याचमुळे नोटबंदीचा प्रचंड त्रास होऊनही, या निर्णयाला देशभक्तीची जोड दिली गेल्याने, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणे अनेकांनी पत्करले. आता मात्र त्यातील अनेक दावे फोल असल्याचे पुढे येत असतानाच, बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळ्यांचा छडा लावण्यात मुंबईतल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

 विक्रोळीच्या प्रविण हाँटेलमध्ये आरोपी बनावट नोटांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  त्यानुसार गुन्हे शाखा ७ च्या पोलिसांनी सापळा रचून अब्दुल कल्लू खान (२४), महेंद्र तुकाराम खंडस्कर (५०), फारूख पाशा चौधरी (३३), आमीन उस्मान शेख (४१) यांना अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी २ हजाराच्या ३१० नोटा, ५०० च्या ४२१७ नोटा, २०० च्या २२७६ नोटा, १००  च्या ३७०३ नोटा असे ३५ लाख ७० हजार ३०० रुपये हस्तगत केले आहेत.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा