प्रसिद्ध कार डिझायनर आणि डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करण्याच्या आरोपाखाली दिलीप छाब्रिया यांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांची गाडीही जप्त केली आहे.
हेही वाचाः- ईडीच्या कार्यालावर शिवसैनिकांनी लावलं भाजपा प्रदेश कार्यालयाचे पोस्टर
कार नोंदणीकरणात गैरव्यवहाराप्रकरणी प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया(डीसी) याला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याविरोधात भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब) व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक व बनावट कागदपत्रे बनवण्यात आल्याचा आरोप आहे. गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी एक कारही जप्त करण्यात आली आहे. दिलीप छाबरिया हा डीसी डिझाईन कंपनीचा संस्थापक असून एमआयडीसी येथील कार्यालयातून त्याला अटक करण्यात आली आहे. कार मॉडिफिकेशनमध्ये देशातील सर्वात प्रसिद्ध डिझायनर म्हणून त्याची ओळख आहे. अनेक चित्रपटांसाठीही त्याने कार डिझाईन केल्या आहेत