'फोर्स २' चित्रपटफुटी प्रकरणी पिता-पुत्राला अटक

 Mumbai
'फोर्स २' चित्रपटफुटी प्रकरणी पिता-पुत्राला अटक

मुंबई - अभिनेता जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या फोर्स 2 चित्रपट लीक प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर ग्वाल्हेरमधून पिता-पुत्रांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. प्रमोद प्रकाश शिवरे (49), अर्जुन शिवरे (25) अशी या दोघांची नावे आहेत.

फोर्स2 हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. मात्र त्यापूर्वीच तो यु-ट्युब आणि अनेक वेबसाईटवर लीक झाला होता. हा चित्रपट लीक झाल्याची माहिती मिळताच, तत्काळ या प्राॅडक्शन कंपनीने या प्रकरणी सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला होता.

याचा तपास सुरु असताना चित्रपट ग्वाल्हेर येथून लीक झाल्याची माहिती सायबर सेलला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तत्काळ छापेमार करत पिता-पुत्राला अटक केली.

Loading Comments