औषध निर्मिती कंपनीला एफडीएचा दे धक्का


औषध निर्मिती कंपनीला एफडीएचा दे धक्का
SHARES

मुंबई - औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदा धाब्यावर ठेवत अनेक नामांकित औषध कंपन्यांनी औषध निर्मिती करत रुग्णांच्या आयुष्याशी खेळ करत आहेत. अऩ्न आणि औषध प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत केलेल्या कारवाईतून हे स्पष्ट झालंय. याआधी मे. बीडीएच आणि मे. विनटेकसारख्या नामांकित कंपनीच पितळ उघड करत त्यांना दणका दिल्यानंतर आता आणखी एका नामांकित औषध कंपनीच्या मुसक्या एफडीएने आवळल्यात. गेली वीस वर्षे प्रतिजैविके आणि इंजेक्शन निर्मितीतील आघाडीच्या आणि देशविदेशात औषधांची निर्यात करणाऱ्या मे. संजीवनी पॅरेटेरल्स कंपनीविरोधात नुकतीच एफडीएनं कारवाई केली.
ही कंपनी औषधांच्या पूर्व चाचण्या न करताच औषधांचे उत्पादन करत औषधांची विक्री करत असल्याची धक्कादायक बाब एफडीएच्या कारवाईतून समोर आली आहे. तर तज्ज्ञांच्या गैरहजेरीत औषध निर्मिती केली जात असल्याचंही उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे मुदतबाह्य घटकांचा वापर करत ही कंपनी औषध निर्मिती करत असल्याचंही निर्दशनास आलंय. अशा प्रकारे औषध निर्मिती करत कंपनी रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचं स्पष्ट झालंय. याप्रकरणी एफडीए अधिक चौकशी करत असून कंपनीविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएच्या दक्षता विभागाकडून देण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा