आईस्क्रिमच्या वादातून तरूणाला भोसकले


SHARE

महाराष्ट्रनगर - भांडुपमध्ये आईस्क्रिमने माखलेले बोट लागल्याने रागाच्या भरात २५ वर्षीय तरूणाने तीन जणांवर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी भांडुपच्या महाराष्ट्रनगरमध्ये ही घटना घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून भांडुप पोलिसांनी या हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.

अविनाश भोसले आणि त्याचे दोन मित्र महाराष्ट्रनगरमधील गोपाळ दूध डेअरीजवळ आईस्क्रिम खात उभे होते. त्यावेळी त्याच्या मित्राचा आईस्क्रिमचा हात एका तरुणाला लागला. रागाच्या भरात तरुणाने मुरगूनला शिवीगाळ करत मारहाण केली. प्रकरण मिटवण्यासाठी मधे पडलेल्या अविनाशला चाकू भोसकून आणि इतर दोघांवर वार करत आरोपीने पळ काढला. हल्ल्याची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी तिन्ही जखमींना उपचारांसाठी मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले आणि अज्ञात हल्लेखोराविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या