अवैध दारू तस्करी प्रकरणी गुन्हे दाखल

लॉकडाऊन काळात राज्यात एकूण ८७५६ गुन्हे नोंदविण्यात आले असून ४१२७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ७५६ वाहने जप्त करण्यात आली असून रु.२२.२२ /- कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध दारू तस्करी प्रकरणी गुन्हे दाखल
SHARES

लाॅकडाऊनमुळे राज्यभरात अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता सर्वच दुकानांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तळीरामांची चांगलीच पंचायत झाली होती. तरी ही बाजारात काळ्याबाजाराने काही जण दारूची तस्करी करत होते. माञ ती या तळीरामांच्या खिशाला न परवडणारीच, एका दारूच्या बाटलीसाठी तब्बल अडीच हजार रुपये काळ्याबाजारात स्विकारले जात होते. माञ तरी ही काही हौशी मिळेल त्या भावात दारूची पोलिसांच्या पाठीमागे दारू खरेदी करायचे.  त्यामुळे राज्यात दारू तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली होती. अशा दारूच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी लक्ष ठेवून असायचे.

हेही वाचाः- SSC-HSC Results: जुलै अखेरपर्यंत लागणार दहावी, बारावीचा निकाल

राज्यात १५ मे २०२० रोजी पासून ते आतापर्यंत तब्बल २० लाख ५० हजार ०२३ ग्राहकांनी आँनलाईन मद्यखरेदी केली आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ८ हजार २२२ अनुज्ञप्ती सुरू आहेत. माञ तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून अवैध मद्य तस्करी केली जात आहे. ही तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. २० जून २०२० रोजी राज्यात ६३ गुन्हे नोंदविण्यात आले असून २९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. रु.११.९५ लाख किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर २४ मार्च २०२० पासुन  २० जून २०२०पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण ८७५६ गुन्हे नोंदविण्यात आले असून ४१२७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ७५६ वाहने जप्त करण्यात आली असून रु.२२.२२ /- कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचाः- मालाडसह ४ परिसरांचा आयुक्तांनी घेतला आढावा

राज्यात ३३ जिल्ह्यांमध्ये सध्या दारूच्या विक्रीला मोजक्याच विक्रेत्यांना परवानगी दिली आहे. देशी दारूची विक्री करणाऱ्या ४१५९ पैकी ३१४१ दुकानदारांना परवानगी दिली आहे. तर १६८५ वाईनशाँप पैकी १५०५ दुकानदारांना परवानगी देण्यात आली आहे. तर ४९४७ बिअर शाँपींपैकी ३५७६ बिअरशाँपी चालवणाऱ्यांना परवानगी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४*७  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.  त्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३ व्हाट्सअँप क्रमांक ८४२२००११३३ ई-मेल commstateexcise@gmail.com असा आहे. करिता सदर नमूद क्रमांकावर अवैध मध्ये विरुद्ध तक्रार नोंदविण्यात यावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात येत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा