क्रॉफर्ड मार्केटमधल्या आगीवर नियंत्रण


SHARES

क्रॉफर्ड मार्केट - क्रॉफर्ड मार्केट आणि त्याला लागूनच असलेलं मंगलदास मार्केट या मुंबईतल्या सुप्रसिद्ध बाजारपेठा. मात्र शुक्रवारी सकाळी अचानक मंगलदास मार्केटमधल्या काही दुकानांतून धुर येऊ लागला आणि एकच धावपळ झाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी आल्या. सुरुवातीला अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणताना त्रास झाला. काही वेळानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. अचानक लागलेल्या आगीमुळे काही काळ परिसरात सगळेच तणावाखाली होते. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा