तळोजा एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट; १४ गावांना हादरे

हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटामुळे कल्याणजवळच्या १४ गावांना हादरे बसले. अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटून भिंतीना तडे देखील गेले आहेत.

तळोजा एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट; १४ गावांना हादरे
SHARES

तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सोमवारी सकाळी भीषण स्फोट झाला. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खड्डा खोदत असताना केमिकलच्या ड्रमला जेसीबीचे फावडे लागल्याने सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास स्फोट झाला. यामध्ये संतोष धर्मा पाटील हा जेसीबी चालवणारा कामगार जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



भिंतीना तडे

 स्फोटाची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटामुळे कल्याणजवळच्या १४ गावांना हादरे बसले. अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटून भिंतीना तडे देखील गेले आहेत.


रासायनिक कचऱ्याची विल्हेवाट 

तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रासायनिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम केलं जातं. सोमवारी सकाळी खड्डा खोदून त्यामध्ये रसायनांनी भरलेले दोन ड्रम टाकण्याचं काम सुरु होतं. यावेळी ड्रम फुटून दोन केमिकल्स एकत्रीत आल्यानं हा स्फोट झाला आहे.



हेही वाचा - 

८० काेटींचा जीएसटी बुडवला, पुण्यातल्या व्यापाऱ्याला मुंबईत अटक

नोकरीचं आमिष दाखवून १२ महिलांना परदेशात वेश्या व्यवसायात ढकललं

कपड्याचं माप घेतना महिला डॉक्टरचा विनयभंग




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा