ठाण्यात वेफर्स गोदामाला भीषण आग

शुक्रवारी पहाटे ३ च्या समुरास ठाणे शहरातील मानपाडा परिसरातील वेफर्स गोडाऊनला भीषण आग लागली.

ठाण्यात वेफर्स गोदामाला भीषण आग
SHARES

शुक्रवारी पहाटे ३ च्या समुरास ठाणे शहरातील मानपाडा परिसरातील वेफर्स गोडाऊनला भीषण आग लागली. मानपाड्यातील कोठारी कंपाऊंड इथं असलेल्या पेप्सी आणि लेस वेफर्स गोदामाला ही आग लागली. सुमारे ६ हजार २०० चौरस फूट असा या गोदामाचा परिसर आहे.

माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. एक अग्निशमन इंजिन, दोन जंबो पाण्याचे टँकर, एक पाण्याचे टँकर आणि एक बचाव वाहन आणि एक जेसीबी घटनास्थळी दाखल झाले होते. ३-४ तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सकाळी आग आटोक्यात आल्यानंतर कूलिंगचं काम सुरू आहे.

रीजनल डिजास्टर मॅनेजमेंट सेलनं (RDMC) सांगितलं की, गोदामात लोडिंगसाठी एकूण १२ डिलिव्हरी टेम्पो पार्क करण्यात आले होते. टेम्पो ले वेफर्स आणि पेप्सीच्या बाटल्यांनी भरले आहेत. आगीमागील कारण अद्याप समजू शकले नाही. यात कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र गोदाम झळाल्नं प्रचंड नुकसान झालं आहे.



हेही वाचा

कांदिवलीत रहिवाशांच्या तक्रारीनंतर महापालिकेने जप्त केले सिलिंडर

मुंबई, पालघरमध्ये दीड कोटींचा खाद्यतेलसाठा जप्त

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा