कांदिवलीत रहिवाशांच्या तक्रारीनंतर महापालिकेने जप्त केले सिलिंडर

महापौरांनी अलीकडेच नागरिकांना त्यांच्या भागातील बेकायदेशीर गॅस सिलेंडर्स ठेवण्याबाबत आणि तक्रारी सादर करण्यास सांगितलं होतं.

कांदिवलीत रहिवाशांच्या तक्रारीनंतर महापालिकेने जप्त केले सिलिंडर
SHARES

कांदिवलीतील रहिवासी ठिकाणी नुकतीच एका नागरिक निवारण मंचानं गॅस सिलिंडर्स बेकायदेशीरपणे ढीग लावल्याची तक्रार ट्विटरवर करण्यात आली होती. या तक्रारीसह मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना देखील ट्विटमध्ये टॅग केलं गेलं होतं.

प्रशासकिय अधिकारी तसंच उपमहापौर सुहास वाडकर यांनी अवघ्या २ तासात त्या ठिकाणी भेट दिली. भेट देऊन त्यांनी कारवाईचा बडगा उचलला. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या डझनभर सिलेंडर्सना जप्त करण्यात आले.

मुंबई उत्तर मध्य जिल्हा मंच (@ एमएनसीडीएफबॉम्बे) यांनी ट्विटरद्वारे ही तक्रार केली आहे.

“मॅम महापौर किशोरी पेडणेकर आम्ही तुमच्याकडे एक तक्रार करत आहोत. परिसरात गॅस सिलिंडरचं गोदाम आहे. तसंच आम्ही @mybmc ला टॅग करीत आहोत! अपघात झाल्यास बीएमसी, पोलिस आणि राज्य सरकार पूर्णपणे जबाबदार असतील. स्थळ – पिनसुर जिमखाना,पुष्पांजली जिमखाना, कांदिवली,”

व्यासपीठाचे सभासद वकील त्रिवेण कर्णानी म्हणाले की, महापौरांनी अलीकडेच नागरिकांना त्यांच्या भागातील बेकायदेशीर गॅस सिलिंडर्स ठेवण्याबाबत आणि तक्रारी सादर करण्यास सांगितलं होतं.

कर्णानी यांनी नमूद केलं की, ही विशिष्ट तक्रार बोरिवली वेस्टच्या पोईनसुर इथल्या रहिवासींकडून आली आहे. कर्णानी म्हणाले, “सर्वसाधारणपणे या विषयावर तात्काळ कृती करतांना कधी पाहिलं नाही. परंतु या वेळी स्वत: महापौरांकडून तात्काळ कारवाही झाली याचं निश्चितच स्वागत आहे,” कर्णानी म्हणाले.

आर सेंट्रल वॉर्डचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजय कुऱ्हाडे म्हणाले, “अनेक गॅस सिलेंडर्स असलेली ट्रक्स निवासी भागात पार्क केले जातात. हे हानीकारक असू शकतं. त्यांनी ते गोदाममधूनच वितरित केले पाहिजे. म्हणून आम्ही काही ताब्यात घेतले.”

टीओआयशी बोलताना महापौर पेडणेकर म्हणाल्या की, नागरिकांच्या चिंता सोडवण्याला नेहमीच प्राधान्य असते. महापौरांकडून थेट हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी फोन आला तेव्हा आपण चौकाच्या उद्घाटनप्रसंगी असल्याचं उपनगराध्यक्ष वाडकर यांनी नमूद केलं.

“त्यांचा मला फोन आला. फोनवर त्यांच्याशी बोलल्यानंतर मी तात्काळ स्थानिक पोलिस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घटनास्थळाकडे निघालो, ”वाडकर म्हणाले.



हेही वाचा

ज्वेलर्स दुकान फोडून २ कोटी ८२ लाखांचे दागिने लंपास

घाटकोपरमध्ये तृतीयपंथीयांकडून वाहतूक पोलिसाला मारहाण

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा