ज्वेलर्स दुकान फोडून २ कोटी ८२ लाखांचे दागिने लंपास

चोरट्यांनी जाता जाता मागे एकही पुरावा सोडला नाही. चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून सीसीटीव्ही फुटेज ज्या टीव्हीमध्ये सेव्ह होतात ती डिव्हीआर मशीन देखील पळवून नेली आहे.

ज्वेलर्स दुकान फोडून २ कोटी ८२ लाखांचे दागिने लंपास
SHARES

मुंबईत ज्वेलर्सचं दुकान फोडून तब्बल २ कोटी ८२ लाख रुपयांचे दागिने चोरून नेण्याची घटना उघडकीस आली आहे. काळाचौकी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबेवाडी येथील मंगल ज्वेलर्सवर दरोड्यांनी दरोडा टाकला. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली

दरोड्यात दरोडेखोरांनी २ कोटी ८२ लाख रुपयांचे १५ प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले. चोरट्यांनी जाता जाता मागे एकही पुरावा सोडला नाही. चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून सीसीटीव्ही फुटेज ज्या टीव्हीमध्ये सेव्ह होतात ती डिव्हीआर मशीन देखील पळवून नेली आहे. त्यामुळे  चोरांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. 

चोरट्यांनी दरोडा टाकण्याआघी मंगल ज्वेलर्सची रेकी केली. कोणत्या वेळेस या ज्वेलर्सच्या बाहेर गर्दी नसते, मध्यरात्री कोणत्या वेळेस मंगल ज्वेलर्स परीसर निर्मनुष्य असतो हे त्यांनी आधीच पाहिले होते.  मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंगल ज्वेलर्सच्या बाहेरील स्ट्रीट पोलवरील लाईट कट केली आणि कटरने शटरचे लाॅक तोडून ते आत शिरले. त्यांनी आधी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. त्यानंतर  दरोडा घातला. यामध्ये त्यांनी साडे पाच किलो सोन्याचे दागिने तसेच ९ किलो चांदी असा २ कोटी ८२ लाखांचा ऐवज घेऊन पळ काढला. 

दरोडेखोरांनी आपली चोरी पकडली जाऊ नये याकरता दुकानातील सीसीटीव्ही फुटेज साठवले जाते ती डिव्हीआर मशीनच चोरांनी चोरुन नेली. त्यामुळे नेमक्या किती जणांनी ज्वेलर्सवर दरोडा टाकला, कोणी नेमके काय केले याबाबत पोलिसांना काहीच सुगावा लागत नाही, अशी माहिती काळाचौकी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंग पाटील यांनी दिली.



हेही वाचा -

कोरोना: मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांवर महापालिकेची नजर

राज्यात आठवड्यानंतर कडक निर्बंधांचे संकेत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा