Advertisement

कोरोना: मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांवर महापालिकेची नजर

मुंबईसह राज्यभरात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढत असून, महापालिका व राज्य सरकारनं कडक निर्बंध लागू केले आहेत.

कोरोना: मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांवर महापालिकेची नजर
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढत असून, महापालिका व राज्य सरकारनं कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं महापालिका सतर्क झाली आहे. मुंबईतील गर्दीची ठिकाणांवर महापालिका नजर ठेवून आहे. कोरोनाविषयक नियम पायदळी तुडविणारी हॉटेल, तसेच मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळं गुरुवारपासून मुंबईत कारवाईचा धडाका सुरू होण्याची शक्यता आहे.

गतवर्षी गणेशोत्सवानिमित्त ठिकठिकाणी झालेल्या गर्दीमुळं ऑगस्टअखेरीस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली होती. मात्र कोरोनाविषयक चाचण्यांचं प्रमाण वाढून बाधित रुग्णांना अलगीकरणात ठेवण्यावर महापालिकेनं भर दिला. त्यामुळं कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येऊ लागली होती. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांसाठी उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती.

अखेर राज्य सरकारनं सर्वसामान्य नागरिकांसाठी मर्यादित वेळेत लोकल सेवा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर नागरिक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडू लागले आहेत. त्याचवेळी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. बाजारपेठांमध्येही प्रचंड गर्दी दिसू लागली आहे. अनेकांनी मास्क न वापरता बेफिकीरपणं वागणं सुरू केलं आहे.

वाढती गर्दी आणि नियम न पाळण्याची वृत्ती यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याचे दिसत आहे. रुग्णवाढीची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गर्दीच्या ठिकाणांवर बारीक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वेळप्रसंगी संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे तोंडी आदेशही त्यांनी दिले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील हॉटेल रात्री १ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरीही हॉटेलमधील आसन क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना प्रवेश देण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, ही सूचना धुडकावण्यात येत असून सध्या हॉटेलमध्ये मोठय़ा प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. तसेच विवाह सोहळ्यांना केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असताना विवाह सोहळ्यांनाही प्रचंड गर्दी होत आहे. तसेच उद्यानांमध्येही गर्दी वाढू लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन गर्दीच्या ठिकाणांवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी विभाग कार्यालयांमधील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.हेही वाचा -

महापौरांचा लोकल प्रवास, हात जोडून केली मास्क घालण्याची विनंती

मुंबईतील चार वॉर्ड पुन्हा हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा