Advertisement

मुंबईतील चार वॉर्ड पुन्हा हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे ४ वाॅर्ड पुन्हा एकदा कोरोना हाॅटस्पाॅट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबईतील चार वॉर्ड पुन्हा हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे ४ वाॅर्ड पुन्हा एकदा कोरोना हाॅटस्पाॅट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे. 

के ईस्ट (अंधेरी पूर्व, जोगेश्वरी), टी वॉर्ड (मुलुंड), आर सेंट्रल (बोरिवली), एम वेस्ट( चेंबुर, टिळक नगर) या चार वॉर्डमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. या वॉर्डमध्ये रोज नवीन रुग्णांची संख्या १० ते १५ टक्के वाढत आहे.  चेंबुर, टिळक नगर आणि मुलुंड या भागात रुग्ण संख्या वाढीचा दर सर्वाधिक ०.२६ टक्के आहे. चेंबूरमध्ये सरासरी २० रुग्ण आढळत असून मुलुंडमध्ये रोज सरासरी ४० रुग्ण आढळत आहेत.

मुंबईत रोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात ४०० होती. फेब्रुवारीपासून यात पुन्हा वाढ होऊन ही संख्या पाचशेपर्यंत पोहोचली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर मंगळवारी आणखी वाढला असून आता हा दर ०.१६ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या आठवडय़ाभरात हा दर ०.१२ टक्के होता. त्या तुलनेत चार वाॅर्डमधील रुग्णवाढीचा दर अधिक आहे. मंगळवारी ४६१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे.  

मुंबई महापालिकेने नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी रहिवासी इमारतींना नोटीसा देखील बजावल्या आहेत. मुंबईत सार्वजनिक ठिकाण, विवाह कार्यालये, बाजार, गर्दीची ठिकाणी कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

इमारतीत बाहेरून येणाऱ्या व्यक्तींचे स्क्रीनिंग करण्याच्या आणि कमीत कमी लोकांना इमारतीत प्रवेश देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पालिकेने एम वेस्ट वॉर्ड मध्ये ५५० इमारतींना नोटीसा दिल्या आहेत.  मुंबईत सध्या ८१० इमारती सील आहेत. यांपैकी टी वॉर्ड (मुलुंड) मध्ये सर्वाधिक १७० इमारती सील केल्या आहेत. मुंबईत सध्या कंटेंटमेंट झोनची संख्या ७६ आहे.

 वॉर्ड                            सक्रिय रुग्ण

के ईस्ट-अंधेरी, जोगेश्वरी           ३३४

टी वॉर्ड - मुलुंड                     २८९

आर सेंट्रल- बोरिवली                ४०२

एम वेस्ट-टिळक नगर, चेंबूर        १७२



हेही वाचा -

IRCTC कडून नवीन पेमेंट गेटवे लाँच

राज्यात ७ लाख ४१ हजार ३७० लाभार्थ्यांना कोविड लसीकरण



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा