घाटकोपरमध्ये तृतीयपंथीयांकडून वाहतूक पोलिसाला मारहाण

घाटकोपरमध्ये चार तृतीयपंथीयांनी वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

घाटकोपरमध्ये तृतीयपंथीयांकडून वाहतूक पोलिसाला मारहाण
SHARES

घाटकोपरमध्ये चार तृतीयपंथीयांनी वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाहतूक पोलिसांना पंतनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. 

विक्रोळी वाहतूक विभागात कार्यरत असलेले विनोद बाबुराव सोनवणे (३८) हे छेडानगर सब वे येथे मंगळवारी सायंकाळी ड्युटीवर होते. यावेळी ६ ते ६.३० वाजताच्या सुमारास एका रिक्षातून चार जण प्रवास करत असल्याचं त्यांना दिसून आलं. सोनावणे यांनी ती रिक्षा अडवली आणि रिक्षाचा फोटो काढला. रिक्षात बसलेले चारही जण तृतीयपंथीय होते. त्यानंतर तृतीयपंथीयांनी रिक्षातून खाली उतरत ट्रॅ विनोद सोनवणे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वाद इतका वाढला त्यांनी सोनावणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आधी सोनवणे यांच्या डोक्याला मारण्यात आली आणि मग त्यांना लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. या वादात सोनावणे यांचा गणवेशही फाडला आणि त्यांच्या हातातील वॉकीटॉकी हिसकावून खाली जमिनीवर आपटली. 

चारही तृतीयपंथीयांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरोधात कलम ३५३, ३३२, २९४, ४२७, ५०४, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लवली करण पाटील (२७), विकी रामदास कांबळे (२६), तनु राज ठाकूर (२४), जेबा जयंत शेख (२४) अशी आरोपींची नावे आहेत. चौघेही घाटकोपर पूर्वेकडील पंचशीलनगरमध्ये राहतात.



हेही वाचा -

IRCTC कडून नवीन पेमेंट गेटवे लाँच

राज्यात ७ लाख ४१ हजार ३७० लाभार्थ्यांना कोविड लसीकरण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा