एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये आग

 Pali Hill
एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये आग

वांद्रे - वांद्रे-कुर्ला संकुलातल्या एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये ही आग लागली. बुधवारी रात्री 9.30च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीमुळे बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर साठला होता. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या जवानांना सुरुवातीला आग विझवण्यात अडचणी येत होत्या. मात्र या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आलं. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग नक्की कोणत्या कारणामुळे लागली याविषयी रात्री उशिरापर्यंत माहिती मिळू शकली नव्हती.

Loading Comments