कांदिवलीतल्या कारखान्याला आग

 Kandivali
कांदिवलीतल्या कारखान्याला आग
कांदिवलीतल्या कारखान्याला आग
कांदिवलीतल्या कारखान्याला आग
See all

कांदिवली - मुंबईच्या कांदिवली परिसरात बुधवारी भीषण आग लागली. हिंदुस्तान नाक्याजवळच्या संध्या बारमागे चालणाऱ्या पाच अनधिकृत कारखान्यांना ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिग्रेडच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीसही तात्काळ घटनास्थळी पोहचले. आग विझवण्याचं काम तातडीनं हाती घेण्यात आलं. इथल्या कारखान्यांमध्ये ठेवलेल्या विषारी आणि ज्वलनशील रसायनांच्या पिंपांमुळे आग पसरण्याची भीती होती.

Loading Comments