कॉफर्ड मार्केटमध्ये आग

क्रॉफर्ड मार्केट - मार्केटला आग लागली पळा पळा असं म्हणण्याची वेळ शुक्रवारी कॉफर्ड परिसरातील रहिवाशांवर आली. क्रॉफर्ड मार्केट परिसात शुक्रवारी दोन ठिकाणी आग लागली. पहिली आग शुक्रवारी सकाळी सहा वाजता मंगलदास मार्केटमध्ये लागली. तर दुसरी आग दुपारी चार वाजता शरीन इमारतीतल्या गोदामात लागली होती. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण होतं.

मंगलदास मार्केटमध्ये सकाळी लागलेल्या आगीवर अग्निशमन दलानं एक तासात नियंत्रण मिळवलं. तर शरीन इमारतीतल्या गोदामाला लागलेली आग अग्निशमन दलानं मोठ्या प्रयत्नानं विजवली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पण या आगीत गोदाम जळून खाक झालं.

कॉफर्ड मार्केटला आग लागण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. याआधीही अशा घटना अनेकदा घडल्यात. त्यामुळे आग लागते की मुद्दाम लावली जाते हा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होतोय.

Loading Comments