कुर्ल्यात 30 गोदामांना आग

कुर्ला - कुर्ला पश्चिमच्या मोहम्मद अली इस्टेट परिसरात शुक्रवारी रात्री 1 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जवळपास 30 गोदामे आणि एक स्कॉर्पियो गाडी जळून खाक झाली. ही सर्व भंगाराची गोदामे असल्याने आग पसरत गेली. जवळपास 9 सिलिंडरचाही स्फोट याठिकाणी झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या आणि 8 अॅम्ब्युलन्स दाखल झाल्या. आगीत अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. तर, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचं समजतंय.

Loading Comments