मालाडमध्ये इमारतीला भीषण आग

 Malad West
मालाडमध्ये इमारतीला भीषण आग
मालाडमध्ये इमारतीला भीषण आग
मालाडमध्ये इमारतीला भीषण आग
See all
Malad West, Mumbai  -  

मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात चावडा कमर्शियल इमारतीमधील एका गाळ्यात मंगळवारी भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील एव्हरशाईन मॉलच्या मागे असलेल्या विजय इंडस्ट्रीयल इस्टेट येथील चावडा कमर्शियल इमारतीमधील एका गाळ्याला ही आग लागली असून, आग विझविण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच, या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी आगीत आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आग लागलेली इमारत तीन मजली असून, इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली होती.

Loading Comments