दादर फूल मार्केटमध्ये गोळ्या झाडून एकाची हत्या


दादर फूल मार्केटमध्ये गोळ्या झाडून एकाची हत्या
SHARES

मुंबईच्या दादर फूल मार्केटमध्ये फुलं आणि वजन काटा पुरवणाऱ्या मनोज मौर्या या तरुणाची अनोळखी मारेकऱ्यांनी आज सकाळी 6 वा.च्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केली. पूर्व वैमन्यसातून ही हत्या करण्यात आल्याचं बोललं जातं.


कोण आहे मनोज मौर्या?

दादर फूल मार्केट परिसरात मनोज मौर्या हा तेथील व्यापाऱ्यांसोबत अनेक वर्षांपासून काम करत होता. पूर्वी फुलांची विक्री करणाऱ्या मनोजने कालांतरानं इलेक्ट्रिक वजन काटा पुरवण्याचाही व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे आज सकाळी बाजारात फुलं खरेदी करणाऱ्यांची गर्दी होती. नेहमीप्रमाणे मनोज हा सकाळी 5 वा. सेनपती बापट मार्गावरील प्रमोद महाजन गार्डनजवळ आला होता. हाततली काम अटपत असताना परळहून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्याच्यावर गोळ्या झाडून दोघेही फरार झाले.


उपचारादरम्यान मृत्यू

गोळीच्या आवाजांनी सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं. त्यावेळी सर्वांनीच मनोजच्या दिशेने धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मनोजला व्यापाऱ्यांनी आणि विक्रेत्यांनी परळच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.


हत्येचा गुन्हा दाखल

याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर दादर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपीची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं. आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेत असल्याचं दादर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा