जोगेश्वरीत घराचा भाग कोसळून 5 जण जखमी

जखमी तरुणीवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जोगेश्वरीत घराचा भाग कोसळून 5 जण जखमी
Representational Image
SHARES

जोगेश्वरीतील मजासवाडी परिसरातील चुन्नीलाल मारवाडी चाळी येथे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एका घराचा भाग अचानक कोसळला. या अपघातात दोन पुरुषांसह तीन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींपैकी चार जणांना रुग्णालयात दाखल करून उपचारानंतर घरी सोडण्यात आले. जखमी तरुणीवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या अपघातात ललिना भाटी (26), विक्रम भाटी (28), नितीन म्हामुणकर (42), फॅन्सी भाटी (35) आणि 11 वर्षीय लतिका हे जखमी झाले.

जखमींना तातडीने जवळच्या ट्रॉमा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विक्रम, नितीन, फॅन्सी आणि लतिका यांना फारशी दुखापत झाली नसून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सध्या लतिका यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.



हेही वाचा

घाटकोपरमध्ये झाड कोसळून महिलेचा मृत्यू

अग्निसुरक्षा नसल्यास भरावा लागेल दंड

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा