आयपीएल मॅचदरम्यान सट्टा खेळणाऱ्या ५ जणांना अटक


आयपीएल मॅचदरम्यान सट्टा खेळणाऱ्या ५ जणांना अटक
SHARES

आयपीएल मॅच्या १२ व्या सिजनमध्ये सुरू असलेल्या मॅचवर सट्टा  खेळणाऱ्या पाच जणांंचा गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अब्दुल कादिर गफार छुटानी (२७), मिलिंद रमेश सोनी (२९), युसूफ मोहम्मद सुमार (५१), रोनी नवनीत रायचुरा (३४), मनोज सूर्यकांत लोटलीकर (२५) अशी या पाच आरोपींची नावे आहेत.  या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.


२६ मोबाइल जप्त

चारकोपमध्ये काही जण आयपीएलच्या राजस्थान रॉयल आणि किंग इलेव्हन पंजाब मॅचवर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कांदिवली पश्चिमेकडील ऑस्कर रुग्णालयाजवळील रहिवाशी इमारतीत छापा टाकून या पाच आरोपींना अटक केली. या आरोपींकडून सट्टा लावण्यासाठी लागणारे साहित्य २६ मोबाईल फोन, एक लॅपटॉप, एक टीव्ही संच, एक सेटअप बॉक्स, दोन वायफाय राउटर, सहा कार्ड स्वॅपिंग युनिट्स, दोन डोंगल, तीन पेन ड्राइव्ह, एक नोटा मोजण्याचे मशीन आणि ९१ हजार ७०० रुपये पोलिसांनी जप्त केले आहे. या पाच जणांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा