बेपत्ता आई-वडिलांच्या शोधसाठी मुलीचा टाहो, पोलिसही लागले कामाला

न्यायालयानं पोलिसांना पीडित मुलीला तिच्या खऱ्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले खरे, मात्र पीडित तरुणी त्या वेळी सात वर्षाची असल्यामुळे तिला तिच्या लहानपणातले फारसे काही आठवत नसल्यामुळे मुलीच्या आईवडिलांचा शोध घेतांना पोलिसांची आता दमछाक होत आहे.

बेपत्ता आई-वडिलांच्या शोधसाठी मुलीचा टाहो, पोलिसही लागले कामाला
SHARES

मुंबईच्या वेश्या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या २४ वर्षीय मुलीच्या खऱ्या आईबापाचा मुंबई पोलिस मागील तीन वर्षांपासून शोध घेत आहे. पीडित मुलीचं वय ७ वर्ष असताना तिचे अनोळखी व्यक्तींनी अपहरण करत तिला वेश्या व्यवसात ढकललं. आपल्यावर घडलेल्या अत्याचाराची माहिती तीन वर्षांपूर्वी मुलीने ओशिवरा पोलिसात दिल्यानंतर हा प्रकार पुढे आला. या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली. मात्र न्यायालयाने पोलिसांना पीडित मुलीला तिच्या खऱ्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले खरे, मात्र पीडित तरुणी त्या वेळी सात वर्षाची असल्यामुळे तिला तिच्या लहानपणातले फारसे काही आठवत नाही. त्यामुळे मुलीच्या आईवडिलांचा शोध घेतांना पोलिसांची आता दमछाक होत आहे. 


सात वर्षाची असताना तरुणीचे अपहरण

पीडित तरुणी सात वर्षाची असताना तिचे अनोळखी व्यक्तीने अपहरण करून तिला दिल्लीला नेलं. त्या ठिकाणी त्याने तिला रुबी ठाकूर नावाच्या महिलेकडे ठेवण्यात आलं होतं. त्या ठिकाणी रुबी पीडित तरुणीला घरकाम करण्यास भाग पाडायची. घरकाम करण्यास पीडित तरुणीने नकार दिल्यास रुबी तिला मारहाण करायची. काही महिन्यांनी रुबी पीडितेस घेऊन कांदिवलीच्या ठाकूर काँम्पलेक्समध्ये राहू लागली. पाच वर्षांनंतर रुबीने तिच्या खोलीत आणखी दहा मुलींना ठेवलं होतं. या सर्व मुली रात्रीच्या वेळीस डान्सबार मध्ये कामाला जायच्या,  पीडित तरुणी ११ वर्षाची झाल्यानंतर रुबी ठाकूर तिला घेऊन अंधेरी लोखंडवाला येथील तिच्या मालकीच्या खोलीत वास्तव्यास आली. त्यानंतर तीन वर्ष उलटले. ज्या वेळी तरुणी १४ वर्षाची झाली त्यावेळी रुबीने तिला घरात डान्स शिकवत पहिल्यांना सांताक्रूझच्या एका बारमध्ये डान्स करण्यासाठी पाठवलं.


अल्पवयातच डान्सबारमध्ये ढकललं

डान्सबारचा ते चित्र पाहून तरुणीने रुबीनं पुन्हा तेथे जाण्यास नकार दिला. त्यावेळी रुबीने तिला मारहाण करत तिला डान्सबारमध्ये जाण्यास भाग पाडलं. ऐवढ्यावरच न थांबता रुबीने काही दिवसातच एका व्यक्तीसोबत तरुणीला शारीरिक संबध ठेवण्यावर ही दबाव टाकला. व्यथित तरुणीपुढे दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. अल्पवयीन वयात झालेल्या अत्याचारामुळे पीडित तरुणी मनातून खचलेली होती. रुबीला होकार देण्यापलिकडे तिच्याजवळ कुठलाही दुसरा पर्याय नव्हता. याचाच फायदा घेऊन रुबीने तिला पुढे वेश्या व्यवसायात ढकललं. भारतातच नव्हे तर तिला २००९ आणि २०११ मध्ये रुबीने परदेशातही पाठवलं होतं. त्याच दरम्यान तरुणीची ओळख एका तरुणाशी झाली. दोघेही कालांतराने एकमेकांचे जवळचे मित्र बनले. त्यावेळी तरुणीने त्याला तिच्यावर झालेल्या सर्व अत्याचाराची माहिती दिली. त्यावेळी त्याने तिला रुबीचे घर सोडून येण्यास सांगितले. मित्राच्या घरी आल्यानंतर तरुणीने अत्याचाराची माहिती पोलिसांत दिली. 


न्यायालयाच्या आदेशाने पोलिस लागले कामाला

तीन वर्षांपूर्वी तरुणीने ओशिवरा पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली. या गुंतागुतीच्या गुन्ह्यांचा तपास कालांतराने गुन्हे शाखा ९ या पोलिसांकडे वरिष्ठांनी सोपवला. या गुन्ह्यात पोलिसांनी काही महिन्यात रुबीसह सात जणांना अटक करण्यात आली. मात्र हे आठ ही आरोपी सध्या जामीनावर मुक्त आहे. या गुन्ह्यात न्यायालयाने पुढे पोलिसांना पीडित तरुणीला तिच्या खऱ्या आई-वडिलांकडे सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्या दिवसांपासून पोलिस आजतागायत त्या तरुणीच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत. पीडित तरुणीचं अपहरण करण्यात आलं. त्यावेळी ती सात वर्षांची होती. त्यामुळे त्यावेळीचे तिला फारसे काही आठवत ही नाही. मागच्या तीन वर्षात पोलिसांनी आठ जणांची वैद्यकिय चाचणी ही करून पाहिली. मात्र अद्याप मुलीच्या आई-वडिलांचा शोध लागलेला नाही. सध्या या गुन्ह्याचा तपास विशेष महिला तपास यंत्रणेकडे सोपवला आहे.  

हेही वाचा 

बनावट सर्टिफिकेटप्रकरणी डाॅक्टर अटकेत

शादी डाॅट काॅमवरील ओळख तरूणीला पडली महागात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा