शादी डाॅट काॅमवरील ओळख तरूणीला पडली महागात

मार्च महिन्यात मद्यधुंद अवस्थेत केतनने तरुणीला फोन करून अश्लील भाषेत बोलण्यास सुरूवात केली. त्यानंतर तरुणीने केतनशी बोलणे टाळून त्याचा मोबाइल ब्लाॅक केला. त्यानंतर केतन तिला ई-मेल, फोन आणि कंपनीतील फोनवर फोन करून त्रास देऊ लागला.

शादी डाॅट काॅमवरील ओळख तरूणीला पडली महागात
SHARES

शादी डाॅट काॅम या संकेतस्थळावर एका तरुणासोबत झालेली ओळख दादरमध्ये राहणाऱ्या ३१ वर्षीय तरुणीला चांगलीच महागात पडली. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून इंजिनिअर तरुणाने तरुणीला विविध मार्गाने त्रास देण्यास सुरूवात केली. या प्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी पुण्यातून या इंजिनिअर तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. 


लग्नाला नकार

मुंबईच्या दादर परिसरात राहणारी तरुणी एका नामांकित समाजसेवा संस्थेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. फेब्रुवारी महिन्यात तिची ओळख शादी डाॅट काॅमवर केतन पुराणीक या तरुणाशी झाली होती. मूळचा चंद्रपूरचा राहणारा केतन हा मागील काही वर्षांपूर्वी शिक्षणासाठी पुण्यात आला होता. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो पुण्यातील एका कंपनीत कामाला राहिला होता. दोघांनी एकमेकांना भेटून पुढे लग्नाचा निर्णय घेण्याचे ठरवले. त्यानुसार केतन तरुणीला भेटायला मुंबईत ही आला. मात्र कालांतराने केतनला तरुणीने लग्नाला नकार दिला.


अश्लील भाषेत मेसेज

त्यानंतरही केतन तरुणीच्या संपर्कात होता. मार्च महिन्यात मद्यधुंद अवस्थेत केतनने तरुणीला फोन करून अश्लील भाषेत बोलण्यास सुरूवात केली. त्यानंतर तरुणीने केतनशी बोलणे टाळून त्याचा मोबाइल ब्लाॅक केला. त्यानंतर केतन तिला ई-मेल, फोन आणि कंपनीतील फोनवर फोन करून त्रास देऊ लागला. वारंवार फोन करून आणि अश्लील भाषेत मेसेज पाठवत धमकावू लागल्याने तरुणी नैराश्येत होती. रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने केतनविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. अधिक तपासासाठी ही तक्रार शिवाजी पार्क पोलिसांनी ना.म.जोशी मार्ग पोलिसांकडे वर्ग केली. या प्रकरणीत पोलिसांनी अखेर केतनला पुण्यातून ताब्यात घेतले. या प्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी केतन विरोधात ३५४ (ड),५०६,५०९ भा.द.वि कलमासह गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. 



हेही वाचा -

पश्चिम उपनगरातून १६ हजार लिटर मद्यसाठा जप्त

नामांकित सलून मालकांना कोट्यावधीचा गंडा; ५ जणांना अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा