नामांकित सलून मालकांना कोट्यावधीचा गंडा; ५ जणांना अटक

सलून मालकांनी परत केलेला माल शहा घेऊन गेला. मात्र, त्याने सलून मालकांना पैसे परत केले नाही. तसंच या सलून मालकांनी परत केलेला माल विकून शहा याने पैसा कमावला.

नामांकित सलून मालकांना कोट्यावधीचा गंडा; ५ जणांना अटक
SHARES

मुंबईतल्या २१ नामांकित सलून व ब्यूटी पार्लरची परदेशी सौंदर्य प्रसाधनांमध्ये १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रोनीत शहा (२५), निलेश दुबे (२८), लालजी गुप्ता (४५), अन्वर खान (२४) व शीतल वऱ्हाडे (३१) अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आर. ए. किडवाई पोलिस अधिक तपास करत आहेत. 

  

परदेश वारीचं प्रलोभन

नामांकित सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या एका  परदेशी कंपनीला त्यांचा व्यवसाय मुंबईत वाढवायचा होता. त्यासाठी त्यांनी एका खासगी कंपनीला वितरक म्हणून नेमले होते. त्यांनी नेमलेला सेल्समन रोनीत ऊर्फ जयप्रकाश शहा याने त्याचे ग्राहक असलेल्या सलून व ब्यूटी पार्लरला या कंपनीचा माल मोठ्या प्रमाणात विकला. यावेळी त्याने परदेश वारीसारखी विविध प्रलोभने या सलून कर्मचारी व मालकांना दाखवली. तसंच कोणताही माल उरल्यास तो परत आम्हीच खरेदी करू असं आमीषही दाखवलं. 


सेल्समनकडूनही फसवणूक

त्यानंतर या सलून मालकांनी परत केलेला माल शहा घेऊन गेला. मात्र, त्याने सलून मालकांना पैसे परत केले नाही. तसंच या सलून मालकांनी परत केलेला माल विकून शहा याने पैसा कमावला. हा सर्व व्यवहार आणखी दोन सेल्समनला कळाल्यानंतर त्यांनीही अशा प्रकारे फसवणूक करण्यात सुरूवात केली. 


३ लाखांचा माल हस्तगत

त्यानंतर वितरक कंपनीकडे मुंबईतील २१ नामांकित सलून मालक व कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.  ३ सप्टेंबर २०१८ ते ३ जानेवारी २०१९ या कालावधीत आरोपींनी ही फसवणूक केली आहे. त्यातील रोनीत शहा हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यानंतर इतर दोन सेल्समननेही फसवणूक केली. याप्रकरणी आरोपींविरोधात भादंवि कलम ४२०, ४१९, ४०८, ४११ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन लाखांचा माल हस्तगत करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. हेही वाचा -

नीरव मोदी प्रकरण: मुंबई ईडी प्रमुखांची हकालपट्टी

मेहुल चोक्सीला दणका, बॅंका करणार कंपनीचा लिलाव
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा