Coronavirus cases in Maharashtra: 441Mumbai: 235Pune: 48Islampur Sangli: 25Ahmednagar: 17Nagpur: 16Pimpri Chinchwad: 15Thane: 14Kalyan-Dombivali: 9Navi Mumbai: 8Vasai-Virar: 6Buldhana: 6Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 19Total Discharged: 42BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

नीरव मोदी प्रकरण: मुंबई ईडी प्रमुखांची हकालपट्टी

पंजाब नॅशनल बँक (pnb) घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदी याच्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासाची जबाबदारी असलेले अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) मुंबई विभागाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.

नीरव मोदी प्रकरण: मुंबई ईडी प्रमुखांची हकालपट्टी
SHARE

पंजाब नॅशनल बँक (pnb) घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदी याच्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासाची जबाबदारी असलेले अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) मुंबई विभागाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या 'ईडी' च्या तपास अधिकाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने कार्यमुक्त करण्याच्या निर्णयामुळे अग्रवाल यांना हटवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.


२०१७ मध्ये प्रतिनियुक्ती

१९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या अग्रवाल यांची २०१७ मध्ये ईडीत प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. २९ मार्चला ईडीचे संयुक्त संचालक सत्यव्रत कुमार यांना नीरव मोदी चौकशी प्रकरणातून हटवल्यानंतर अग्रवाल चर्चेत आले होते. मुंबईतील ईडीचा विशेष संचालक पश्चिम विभागाचा प्रमुख असतो. त्याच्याकडे महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इत्यादी राज्यांची जबाबदारी असते.


कार्यकाळ ३ वर्षांनी कमी

अग्रवाल यांना हटवल्यानंतर मुंबईच्या संचालकांचा कारभार चेन्नईतील विशेष संचालकांकडे सोपवण्यात आला आहे. अग्रवाल यांना गृह विभागात पाठवण्यात आलं असून त्यांचा कार्यकाळ देखील ३ वर्षांनी कमी करण्यात आला आहे.हेही वाचा-

मेहुल चोक्सीला दणका, बॅंका करणार कंपनीचा लिलाव

बनावट डेबिट-क्रेडिट कार्डच्या मदतीने आयपीएलच्या तिकिटांची खरेदी - चौघांना अटक

संबंधित विषय
ताज्या बातम्या