बनावट डेबिट-क्रेडिट कार्डच्या मदतीने आयपीएलच्या तिकिटांची खरेदी - चौघांना अटक

आरोपींनी बँकेतील ग्राहकांचे क्रेडिट आणि डेबीटकार्डद्वारे मुंबई झालेल्या आयपीएलच्या सामन्यांची ६८ तिकिटं या संकेतस्थळावरून खरेदी करत असल्याचं भासवलं. या ६८ तिकिटांची किंमत २ लाख ३५ हजार २७ इतकी आहे. बनावट कार्डच्या मदतीनं ही तिकिटं खरेदी करून चार ही आरोपींनी संबधित कंपनीची फसवणूक केली.

बनावट डेबिट-क्रेडिट कार्डच्या मदतीने आयपीएलच्या तिकिटांची खरेदी - चौघांना अटक
SHARES

मुंबई इंडियन्स आणि राँयल चँलेंजर सामन्याची तिकिटे बनावट क्रेडिट-डेबिटकार्डच्या मदतीने खरेदी करून फसवणूक करणाऱ्या चौघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आकाश गोसालिया, केवल गोसालिया, मनिष मोनानी, विजय राजपूत अशी या फसवणूक करणाऱ्यांची नावं आहेत. या चौघांनी संगनमतानं आयपीएलची ६८ तिकिटं खरेदी करून विकल्याचं तपासात पुढे आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


बनावट कार्डद्वारे तिकिटांची खरेदी

मुंबईत सध्या आयपीएलची मोठी धामधूम सुरू असताना. आयपीएलच्या मॅचची तिकिटं खरेदी करण्यासाठी बनावट डेबिट-क्रेडिट कार्ड वापरल्याचं पुढं आलं आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी एका कंपनीतील कर्मचाऱ्यानं सायबर पोलिसात तक्रार नोंदवली होती. संबधित कंपनीच्या संकेतस्थळावरून शहरातील चित्रपटगृहात, नामकिंत कार्यक्रम आणि विविध खेळाच्या स्पर्धेसाठी तिकिट बुकिंग केलं जातं. २४ मार्च रोजी या चार ही आरोपींनी बँकेतील ग्राहकांच्या क्रेडिट आणि डेबीटकार्डद्वारे मुंबई झालेल्या आयपीएलच्या सामन्यांची ६८ तिकिटं या संकेतस्थळावरून खरेदी केली. या ६८ तिकिटांची किंमत २ लाख ३५ हजार २७ इतकी आहे. बनावट कार्डच्या मदतीने ही तिकिटे खरेदी करून चारही जणांनी संबधित कंपनीची फसवणूक केल्याचं कंपनीच्या लक्षात आले. ही सर्व तिकिटे १५ एप्रिल रोजी होणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि राँयल चँलेजर बंगळूरू या सामन्याची होती. त्यानुसार कंपनीने सायबर पोलिसात तक्रार नोंदवली.


चार ही आरोपींना अटक 

सायबर पोलिसांनी १५ एप्रिल रोजी वानखडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स आणि राँयल चँलेजर बंगळूरू या सामन्या दरम्यान ती ६८ तिकिटं घेऊन प्रवेश करणाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावेळी त्या तिकिट खरेदी करणाऱ्यांनी आकाश गोसालिया, केवल गोसालिया, मनिष मोनानी, विजय राजपूत यांच्याकडून तिकिटं खरेदी केल्याचं सांगितले. त्यानुसार सायबर पोलिसांनी या चौघांवर ४१९,४२०,४६५,४६७,४७१,३४ भा.द.वीसह ६६(क), ६६(ड), माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून या चौघांना अटक केली आहे. 

 हेही वाचा - 

सहकारी महिलेचा विनयभंग करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास अटक

मुंबईच्या समुद्रात महाराजा जहाजाला आग, चिफ इंजिनीअरचा मृत्यू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा