मुंबईच्या समुद्रात महाराजा जहाजाला आग, चिफ इंजिनीअरचा मृत्यू

सौदी अरेबियावरून आलेले महाराजा अँरसेन हे आँईल टँकर शनिवारी सकाळी बुचर आयलंडवर आले होते. सायंकाळी या जहाजातून आणण्यात आलेले तेल रिकामी करण्याचे काम सुरू असताना. जहाजावर अचानक आग लागली. शाँर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे म्हटलं जाते. जहाजावर मोठ्या प्रमाणात तेल असल्यामुळे काही क्षणात आगीचा मोठा भडका उडाला.

मुंबईच्या समुद्रात महाराजा जहाजाला आग, चिफ इंजिनीअरचा मृत्यू
SHARES

मुंबईच्या समुद्रात काही अंतरावर असलेल्या बुचर आयलंडजवळ उभ्या असलेल्या तेलवाहू जहाजाला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत एका चिफ इंजिनिअरचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत जहाजावरील २ कर्मचारी ही गंभीर भाजले आहेत. या जखमी कर्मचाऱ्यांवर भायखळाच्या मसीना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या यलोगेट पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


तेलवाहून जहाजाला आग

सौदी अरेबियावरून आलेलं 'महाराजा अग्रसेन' हे आॅईल टँकर जहाज शनिवारी बुचर आयलंडजवळ उभं होतं. जहाजातील तेल रिकामं करण्याचं काम सुरू असताना. जहाजावर अचानक आग लागली. शाॅर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं म्हटलं जातं आहे. जहाजावर मोठ्या प्रमाणात तेल असल्यामुळे काही क्षणात आगीचा मोठा भडका उडाला. आगीचे लोळ जहाजावरील चिफ इंजिनिअरच्या केबीनमध्ये शिरले. त्यावेळी  कर्नाटकचे चिफ इंजिनिअर प्रकाश पाटयाल (५४), हे केबीनमध्ये उपस्थित होते. तर जहाजाच्या केबिन परिसरात उत्तराखंडचे सेकंड चिफ इंजिनिअर सुभाष रवथान (३१) व  कल्याणचे टेक्निशियन तेजो चारूविलायल (२६) हे उपस्थित होते. हे तिघेही आगीच्या लोळात सापडले. जहाजावर स्फोट होऊन आग लागल्याचं दिसताच. समुद्रातील इतर जहाजांकडून मदतीचा ओघ सुरू झाला.


चिफ इंजिनिअरचा मृत्यू

समुद्रातील इतर जहाजांवरील नागरिकांनी 'महाराजा अग्रसेन' या बोटीवरील या तिन्ही जखमी अधिकाऱ्यांना बाहेर काढून तातडीने भायखळाच्या मसीना रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारा दरम्यान चिफ इंजिनिअर प्रकाश पाटयाल (५४) यांचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी घोषित केलं. तर इतर दोघांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. या दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांच्या यलोगेट पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.   



हेही वाचा-

दुर्मिळ सापाची तस्करी करणारे अटकेत

मानखुर्दमध्ये पोलिसाला मारहाण



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा