मानखुर्दमध्ये पोलिसाला मारहाण


मानखुर्दमध्ये पोलिसाला मारहाण
SHARES

ताडदेवमध्ये पोलिस नाईकाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच, पोलिसाची काठी हिसकावून पोलिसालाच मारहाण केल्याचा प्रकार मानखुर्दमध्ये घडला आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने परिसरात सुरू असलेल्या कार्यक्रमावेळी हा प्रकार घडला. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्या तरुणाचा शोध घेत आहेत. 


दोन गटात हाणामारी

मुंबईत विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम १४ एप्रिल रोजी सुरू होते. या निमित्त पोलिसांचा संपूर्ण मुंबईत विशेष बंदोबस्त ठेवला होता.  त्यावेळी मानखुर्द येथील साठे नगर पुलाच्या बाजूला मानखुर्द पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस हवालदार प्रवीण सुर्ववंशी गस्तीवर होते. त्यावेळी काही कारणांवरून दोन गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलिस भांडणे सोडवण्यासाठी पुढे सरसावले. त्यात प्रवीण हे देखील होते. 


पायावर जबर  मारहाण 

प्रवीण यांनी भांडणे सोडवत आकाश नावाच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यावेळी आकाशने गोंधळात प्रवीण यांच्या हातातून काठी हिसकावून घेऊन त्यांच्या पायावर जबर  मारहाण करत तेथून पळ काढला. याप्रकरणी सुर्यवंशी यांच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात भादंवि कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे) व ३३२ (दुखापत करणे) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आकाश त्याच परिसरातील रहिवाशी आहे. त्याचा सध्या शोध सुरू असल्याची माहिती बोबडे यांनी दिली. हेही वाचा -

मुंबईत जबरी चोरीचं प्रमाण ५० टक्क्यांनी वाढलं
संबंधित विषय